Wednesday, December 22, 2021

तुझ्या आघाडीचा एकच ठेवा

रमेश अणावकर व दशरथ पुजारी यांची माफी मागतो. त्यांच्या अजरामर गाण्याचा (केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा..) वापर करून, ही अशी parody केल्याबद्दल🙏🏼

किंबहुना किंबहुना, तुझ्या कामात रे खोटावा
तुझ्या कामात रे खोटावा

तुझ्या आघाडीचा एकच ठेवा, देशमुख सारखे आणती मेवा

वेळोवेळी संकटातुनी घालिसी तव सेना

किंबहुना किंबहुना, तुझ्या कामात रे खोटावा
तुझ्या कामात रे खोटावा

वेडा होऊन खुर्चीसाठी, कोळूनी प्यायले बारामतिकाठी

नागपूराला खंजिर खुपशीत, मंत्रालय गाठला

किंबहुना किंबहुना, तुझ्या कामात रे खोटावा
तुझ्या कामात रे खोटावा

धूर्त भ्रष्ट त्या पक्षांसाठी, साहेबांची सेना घातली मातीत 

खड्ड्यात घालुनी महाराष्ट्राला, तुडविली अस्मिता

किंबहुना किंबहुना, तुझ्या कामात रे खोटावा
तुझ्या कामात रे खोटावा
किंबहुना किंबहुना, तुझ्या कामात रे खोटावा
तुझ्या कामात रे खोटावा.